करमाळा तालुक्यातील विहीर मंजुर झालेल्या लाभार्थ्याना न्याय मिळवुन देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ लक्ष्मी आवटे यांचे २६ जानेवारीला उपोषण
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात अहिल्यादेवी सिंचन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विहीर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत विहिरीचा लाभ आदेश मिळाला नसल्यामुळे त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी सर्व लाभार्थी त्यांचे नातेवाईक यांच्यासह 26 जानेवारीपासून आपल्या कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मीबाई आवटे यांनी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की अहिल्यादेवी सिंचन महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2020- 21 अंतर्गत या योजनेअंतर्गत दोनशे बेचाळीस 242लाभार्थ्यांना विहीर मंजूर करण्यात आलेली आहे सदर विहीर मंजूर होऊन दोन वर्षे होत आहेत तरी देखील अद्यापपर्यंत लाभार्थ्यांना सदरील कामाचे मंजुरी आदेश मिळाले नाहीत व आजपर्यंत त्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्या नसल्यामुळे आम्ही सर्व लाभार्थी आपल्या कार्यालयासमोर सदरील योजनेच्या कार्यालयामध्ये पर्यंत दिनांक 26 जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनापासून सकाळी दहा वाजलेपासून आमरण उपोषण सुरू करणार आहोत तरी याची आपण नोंद घेऊन सगळे योजनेचे कार्यवाही जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सदर उपोषण मागे घेणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी आवटे यांनी सांगितले आहे. 242 विहिरींना यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.यापैकी 53 कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत आणि 33 विहिरी पूर्ण आहेत.उर्वरित 189 विहिरींचे स्थळ पाहणी आदेश दिलेले आहेत.सध्या शासनाने विहिरींचे अनुदान 4 लाख केले आहे आणि दोन विहिरींमधील अंतराची अट शिथिल केली आहे त्यामुळे यापूर्वी मान्यता असणारे शेतकरी इच्छुक असल्यास त्यांना देखील 4 लाखाचा लाभ देण्यात येईल.त्यांनी 26 जानेवारी च्या ग्रामसभेत अर्ज करावेत.सध्या तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांना मान्यतेचे अधिकार शासनाने दिल्याने त्यांना देखील 15 फेब्रुवारी पर्यंत मान्यता देण्यात येईल. मनोज राऊत गट विकास अधिकारी पंचायत समिती करमाळा
