करमाळा शहर व तालुक्यात १२ सप्टेंबर रोजी ४७ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यात १२ सप्टेंबर रोजी एकूण ३१० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ४७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे करमाळा तालुक्यात यात २८ पुरुष तर १९ महिलांचा समावेश आहे करमाळा शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असलेली पहायला मिळाली आहे. आज करमाळा शहरात १४३ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात १६७ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये करमाळा शहरातील कृष्णाजीनगर ३ महिला जामखेडरोड १ पुरुष भीमनगर १ पुरुष कुंकू गल्ली २ पुरुष भवानीपेठ ३ पुरुष मंगळवार पेठ ५ पुरुष मारवाडगल्ली १ महिला मेनरोड १पुरुष, १ महिला जैन मंदिर परिसर १ महिला खडकपुरा १ पुरुष, २ महिला महात्मा गांधी विद्यालय १ पुरुष ७२ बंगले १ महिला यांचा समावेश आहे तर ग्रामीण भागात श्रीदेवीचामाळ १ पुरुष, १ महिला रावगाव १ पुरुष जेऊर ४ पुरुष, १ महिला,उमरड १ पुरुष गुलमोहरवाडी ३ महिला देलवडी १ महिला वांगी ४ पुरुष, २ महिला झरे १ पुरुष, १ महिला निमगाव १ महिला केम १ पुरुष शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करून मास्क न वापरता फिरताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी आता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
