कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरीकांनी काळजी घ्यावी : -माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी. करमाळा शहरात व ग्रामीण भागात सध्या नागरीक काळजी घेत नसल्यामुळे कोरोना समूह संसर्ग वाढत असल्याचे चित्र असून स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणेसाठी सर्वांनी मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पणे स्वयंशिस्तीने पालन करावे असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे . कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव सूरू झालेनंतर करमाळा तालुक्यातील महसूल व पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग,करमाळा नगरपरीषद अधिकारी व पदाधिकारी तालुका व शहरातील सर्वच स्वयंसेवी संस्था व जनतेने घेतलेल्या काळजीमुळे व प्रभावीपणे राबविलेल्या उपाययोजनांमुळे आपण कोरोना संसर्ग रोखण्यात यशस्वी झालो होतो . परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरु होऊन जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच आपलेही कोरोना संसर्गच्या फैलावा बाबतचे गांभीर्य कमी होवून झालेल्या निष्काळजीपणामुळे शहर तसेच तालुक्यात कोरोना बोधितांची संख्या वाढत आहे . हे चित्र निश्चितच दुःखदायी व वेदनादायी असून सर्वच नागरीकांनी स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची व गावाची काळजी घेण्याच्या दृष्टीने कम्पलसरी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे कारण कोरोना बाधीतांची संख्या वाढल्यास आरोग्य विभागांसह सर्वच प्रशासकीय विभाग हे सक्षमपणे सेवा देण्यास हतबल आहेत याचा गांभीर्याने विचार करावा असे कळकळीचे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे .
