Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

वाय.सी.एम. मध्ये ‘थँक्स फॉर टीचर्स’ कार्यक्रम ऑनलाइन संपन्न*

करमाळा प्रतिनिधी
५ सप्टेंबर  यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे यू जी सी च्या निर्देशानुसार शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘थँक्स फॉर टीचर्स’ हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. देशाच्या आणि युवकांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे मोठे योगदान आहे हे लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने शिक्षक दिन हा ‘थँक्स फॉर टीचर्स’ या नावाने साजरा करण्याचे घोषित केले आहे यामध्ये समाजातून व विद्यार्थ्यांतून शिक्षकांचे आभार मानले  व शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, अथर्व जोगळेकर ,रोहिणी सुरवसे, तुकाराम घाडगे, पल्लवी निकम ,ऋषिकेश देवकर ,अशोक ढवळे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता मधून शिक्षकांबद्दल ऋण व्यक्त केले .
    कार्यक्रमाचे  प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे यांनी केले, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्रा. नितीन तळपाडे व प्रा. डॉ.सौ. विजया गायकवाड यांनी विचार व्यक्त केले व कार्यक्रमाचे आभार श्री. अथर्व जवळेकर यांनी मानले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक ऑनलाइन सहभागी झाले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group