करमाळा शहर व ग्रामीण भागात 28 जुलै रोजी 1 कोरोना पाॅझिटीव्ह एकुण रुग्णांची संख्या 90

करमाळा प्रतिनिधी . करमाळा शहर व ग्रामीण 28 जुलै रोजी एकूण 86 जणांच्या अॅन्टोजीन टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये एक रुग्ण कोरोना 1 पाॅझिटीव्ह आला आहे. आज झालेल्या 86 पैकी 85 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.कोरोना पाॅझिटीव्ह असलेला एक पुरुष जेऊर येथील रहिवासी असुन जेऊरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
त्यामुळे करमाळा तालुक्यातील एकुण कोरोना बाधितांची संख़्या ९० झाली आहे तर करमाळा शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख़्या ३३ झाली आहे. सध्या ६९ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून १९ जण बरे होऊन घरी सोडलेले आहेत. आजपर्यंत दोघाजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. करमाळा शहर व तालुक्यात दररोज कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

