ग्रंथालय पूर्ववत चालू करण्यात यावी शिवसेना करमाळा ग्रंथालय संघटनेची मागणी
तालुका ग्रंथालय संघटनेने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे शिफारस करण्याचे दिले रश्मी दिदी बागल यांना निवेदन

करमाळा प्रतिनिधी
शिवसेना ग्रंथालय संघटनेचे वतीने शिवसेना नेत्या रश्मी दिदी बागल यांंना तालुक्यातील सर्व ग्रंथालय पूर्ववत चालू करण्याचे शिफारसपत्र मुख्यमंत्री. उध्दवजी ठाकरे देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने ग्रंथालय बंद ठेवण्याचे जे आदेश दिले आहेत ते शिथील करुन ग्रंथालये सुरु करण्यात यावी. यामुळे आपल्या जिल्ह्यातील ९८४ तर राज्यातील १२७६० ग्रंथालये बंद आहेत. या ठिकाणी काम करणारे २७ ते २८ हजार कामगार आर्थिक अडचणीत आले आहेत. शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे तरुण आता आपल्या गावात आले आहेत, त्यांना पुस्तकांची कमतरता भासत आहे. अशावेळी ही ग्रंथालये उपयोगी ठरणारी आहे. याच बरोबर शासनाच्या वतीने जे ग्रंथालय अनुदान दिले जाते ते वेळेत मिळाल्यास चांगल्या प्रकारे ग्रंथालये चालवता येणार आहेत, या गोष्टीचा शासनाने गंभीरपणे विचार करावा. तालुका शिवसेना ग्रंथालयाच्या वतीने हे निवेदन देताना शिवसेना नेत्या रश्मी बागल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शिफारसपत्र देऊन या मागण्या मांडव्यात अशी विनंती या संघटनेच्या वतीने करण्यात आली. या निवेदनावर विलास भोसले, भोलाशंकर परदेशी, भास्कर पवार, विकास भोसले, अनिल पवार, मच्छिंद्र कांबळे, मुजावर अकबर, संजय गोरे, संदिप नवले, विजय निकत, शंकर घोगरे, शहाजी सरडे, ज्ञानदेव चव्हाण आदि पदाधिकारी होते…
