युवराज प्रोडॅक्शनचे कार्य कौतुकास्पद -गणेश भाऊ करे पाटील
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यासारखा ग्रामीण भागातुन मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवुन युवराज प्रोडॅक्शनची निर्मिती करून करमाळा तालुक्यातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नवनिर्मितीसाठी बिपिन दाभाडे पाटील यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे मत यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यांनी व्यक्त केले.मुंबई,फिल्म सिटी मधील युवराज प्रोडक्शन चे संचालक,करमाळा तालुक्याचे सुपुत्र सहकारी मित्र मा.श्री.बिपिनशेठ दाभाडे पाटील यांच्या करमाळा येथील युवराज प्रोडॕक्शन ,युवराज सोशल फाऊंडेशन ट्रस्टच्या नव्या ऑफीसच्या शुभारंभानिमित्त उपस्थित राहुन यशकल्याणी परिवाराकडून दाभाडे पाटील परिवाराला शुभेच्छा दिल्या. करमाळा तालुक्याचे नाव सैराटच्या नावाने तालुक्याचे सुपुत्र नागराज मंजुळे यांच्यामुळे प्रसिद्ध झाले आता युवराज प्रोर्डक्शनच्या माध्यमातून येथुन पुढच्या काळामध्ये करमाळा तालुक्याचे नाव संपूर्ण जगभरात होईल.यशकल्याणी परिवाराचा विधायक कामासाठी समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आपण सर्वातोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा दिपिकाताई दाभाडे पाटील,पवनपुत्रचे संपादक दिनेश मडके उपस्थित होते.
