बकाले नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या वाचाळ वक्तव्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज करमाळा व मराठा क्रांती मोर्चा करमाळा यांच्यावतीने निवेदन
करमाळा प्रतिनिधी बकाले नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या वाचाळ व वक्तव्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज करमाळा व मराठा क्रांती मोर्चा करमाळा यांच्यावतीने माननीय तहसीलदार समीर माने करमाळा व पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब करमाळा यांना त्याच्यावर कारवाई व्हावी याचे निवेदन देण्यात आले आहे. त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना महाराष्ट्रात मराठा समाज व बहुजन समाज फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनामध्ये मराठा व सर्व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
