खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी पारेवाडीकराची घेतली दखल, डिआरएम कार्यालयाकडुन रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव सादर करणेबाबतच्या सुचना
पारेवाडी प्रतिनिधी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी ऑडिओ पारेवाडीकरची घेतली दखल, डिआरएम कार्यालयाकडुन रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव सादर करणेबाबतच्या सुचना*
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील ग्रामस्थ व रेल्वे प्रवासी संघटना यांनी शनिवार दिनांक १८ मार्च२०२३ रोजी पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांचे थांब्याचे मागणी बाबत *एल्गार- मोर्चाचे* आयोजन केलेले होते. ग्रामस्थ,व्यापारी, महिला यांचेसह वारकरी आणि शाळकरी मुलेही यात सहभागी होती. प्रचंड मोठ्या गर्दीत मोर्चाने रेल्वे विभागाला एक्सप्रेस गाड्या थांबवण्याची मागणी केली.१९९७ पासुन याचा पाठपुरावा चालु असुन, पारेवाडी रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरातुन हजारो प्रवाशांची मागणी विचारांती घेऊन विद्यमान खासदार. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सकारात्मक पाऊले उचलली असुन, दोन ते तीन महिन्यात पारेवाडी रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस थांबविण्या बाबत आश्वासित केलेले आहे. याबाबत रेल्वे विभागाचे अधिकारी यांनीही रेल्वे प्रवासी संघटनेशी चर्चा केली असुन, याबाबतचा प्रस्ताव तातडीने देण्याच्या हालचाली चालु झालेल्या आहेत.
