घारगावच्या विद्यमान सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांचा यश कल्याणी सेवाभावी संस्थेकडून सन्मान
करमाळा प्रतिनिधी
घारगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे आणि विद्यमान सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये समाजभूषण, अहिल्या भक्त, समाजसेवक ,कोरोना योद्धा, नारीरत्न, ग्रेट अचिव्हर्स अवार्ड 2022 ,कर्तुत्वान नारी रत्न, राज्यस्तरीय श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार, राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार, आणि आत्ताच जागतिक महिला दिनानिमित्त त्यांची घारगावच्या महिला सरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तालुका अध्यक्ष एडवोकेट शशिकांत नरुटे यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या शितलताई करे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
