करमाळा

करमाळा येथील उद्योजिका सौ.रेशमा जाधव यांची बडोदा येथे अभ्यास दौऱ्यासाठी निवड

करमाळा प्रतिनिधी
खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रमांतर्गत अकलूज येथे 8 डिसेंबर रोजी लेखी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या होत्या . सदर परीक्षेत सुमारे 2224 इच्छुक नव उद्योजकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये 6 महिला 94 पुरुषांची निवड करण्यात आली. त्यामधे करमाळा येथील नवउद्योजिका म्हणून योग शिक्षिका सौ. रेशमा विजयकुमार जाधव यांची निवड करण्यात आली . हा अभ्यास दौरा 18 ते 22 डिसेंबर या कालावधीत गांधीनगर गुजरात पार पडणार आहे.
या निवडीबद्दल आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार करमाळा, सुरताल संगीत विद्यालय करमाळा , पतंजली योग समिती करमाळा आणि व महिला मंडळ करमाळा यांच्या वतीने स्वागत व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, योगशिक्षक बरडे गुरुजी, संतोष पोतदार गुरुजी, बाळासाहेब देशमाने, वीर गुरुजी कांबळे गुरुजी दनाने सर, नवनाथ थोरात, श्री नलवडे, बाळासाहेब महाजन, सौ सुवर्णा पोतदार , सौ रोहिणी बरडे, शिवकन्या नरारे, निशिगंधा शेंडे,उमेश मगर, शिवलिंग करळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group