करमाळा गटपातळीवरील औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी उद्योजक मनोज बुऱ्हाडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
करमाळा प्रतिनिधी सुवर्ण व्यावसायिक मनोज बुऱ्हाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उद्योग व्यवसायामध्ये यशस्वीपणे वाटचाल करीत यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला आहे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
करमाळा गटपातळीवरील औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित करमाळा या संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी माननीय श्री मनोहर बुऱ्हाडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मित्र परिवाराकडून सत्कार करण्यात आला. त्यांची निवड चेअरमन विजय सुपेकर यांनी केली आहे.
पुढे बोलताना दिपक चव्हाण म्हणाले की आपल्या मनात जिद्द चिकाटी परिश्रम प्रामाणिकता असेल तर माणसाला कुठलीही परिस्थिती आडवी येत नाही.मनोज बुऱ्हाडे यांनी उद्योग व्यवसायात केलेल्या कामामुळे त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून औद्योगिक ग्रामीण बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेच्या व्आहाईस चेअरमनपदी निवड झाली आहे.त्याच्या या पदाच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन उद्योग व्यवसायासाठी आर्थिक सहयोग मिळण्यासाठी मोठे सहकार्य मिळणार आहे.त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या सत्कार समारंभास भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण , चेअरमन विजय सुपेकर डॉक्टर अमोल दुरंदे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर, शिवनाथ घोलप गुरूजी,भाजप शहर चिटणीस सचिन चव्हाण, पत्रकार आशपाक सय्यद, सेवानिवृत्त पी .एस आय निकमसाहेब उपस्थित होते.
