करमाळा

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी आमदार नारायण आबा पाटील व्हाईस चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची निवड

करमाळा प्रतिनिधी अकलूज येथे झालेल्याआदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आ. नारायण पाटील यांची चेअरमनपदी तर महेंद्र पाटील यांची व्हा. चेअरमनपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.आमदार नारायण पाटील हे चेअरमन होतील हे आधीच जवळपास निश्चित होते. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आ. नारायण पाटील यांच्या नावाची चेअरमन म्हणून औपचारिक घोषणा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या व्हाईस चेअरमनच्या निवड प्रक्रियेत महेंद्र पाटील यांच्या नावावर एकमुखाने शिक्कामोर्तब झाले. महेंद्र पाटील हे मोहिते-पाटील गटाचे प्रमुख समर्थक मानले जातात.
व्हा. चेअरमन पदासाठी डॉ. हरिदास केवारे, नवनाथ झोळ, संतोष खाटमोडे-पाटील आणि दादा पाटील या चार अन्य संचालकांचीही नावे चर्चेत होती. मात्र, एकमताने महेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली. चर्चेत असलेल्या उमेदवारांना एक वर्ष संधी मिळणार आहे आदिनाथ कारखान्यावर झालेले बँकेचे व शासकीय कर्ज, कामगारांचे पगार ते व्यापाऱ्यांची देणी आणि कारखाना दुरूस्तीपासून ऊस तोड मुकादम, वाहनधारक, मुकादम या सर्व बाबी पाहून नव्याने येणारा हंगाम यशस्वी करण्याचे मोठे आवाहन नूतन चेअरमन आमदार नारायण पाटील यांना आहे. हे आवाहन ते कसे पार पाडतात याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!