शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 11 ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंद पाळण्याचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरीतील झालेल्या प्रकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसकडून सोमवारी (ता. ११) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. यामध्ये करमाळा शहरही बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्शवभूमीवर करमाळ्यात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोणीही कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक सूर्यकांत यांनी केले आहे.
करमाळा तालुका महाविकास आघाडीतर्फे एक दिवस अन्नदात्यासाठी महाराष्ट्र बंद करमाळा बंदचे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष वारे राष्ट्रवादीचे नेते अभिषेक आव्हाड यांनी केले आहे. याबाबत निवेदनात असे म्हटले आहे की उत्तर भारतातील शेतकरी गेली अनेक महिने आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकारकडे शांततेत आंदोलन करून आपले म्हणणे सरकार पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु वेळोवेळी आंदोलन भाजपा सरकारतर्फे दाबण्याचा भरकटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे परंतु त्यामध्ये त्यांना पुर्णतः यश आले नाही शेतकरी आंदोलन साम दाम दंड भेद वापरून देखील संपत नाही त्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकासआघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असून सोमवार दिनांक 11 ऑक्टोंबर 2021 रोजी महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार आहे त्याअनुषंगाने महा विकास आघाडीतर्फे करमाळा बंद ठेवत आहोत व उत्तर प्रदेशमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून केंद्रसरकारचे या विक्षिप्त कृतीचा निषेध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले., छोटे मोठे हातगाडीवाले, भाजी-फळ विक्रेते तसेच करमाळा शहरातील सर्वच नागरिकांनी याची दखल घ्यावी व बंद मध्ये आपला सहभाग नोंदवून या विक्षिप्त कृतीचा निषेध नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
