ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळाने राजमुद्रा दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट हे गुणवत्ते सोबत च इतर कला गुणांना वाव देणारे इन्स्टिट्यूट म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे याचे कारण की प्रा.निकत सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी 7 तारखेला झालेल्या दहीहंडी उत्सवात खूप चांगली कामगिरी करत तालुक्यातील नावाजलेली राजमुद्रा दहीहंडी फोडण्याचा मान त्यांनी पटकावला.यावेळी मागील काही दिवस रोज सराव करून कालच्या दिवशी गायकवाड चौक येथे सलामी देऊन 2000 रू बक्षीस घेत पुढे दत्त पेठेत 4 थर लावून ट्रॉफी आणि 3000 रू बक्षीस मिळवले तसेच राशीन पेढेत सलामी देऊन ट्रॉफी मिळवली, त्यानंतर मेन रोड येथील दहीहंडी येथे सलामी देऊन बक्षीस व ट्रॉफी मिळवून पुढे छत्रपती चौक येथील मनाची हंडी फोडून विजेते पद मिळवले.मनाची ट्रॉफी मिळवत सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला विशेष म्हणजे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चा यावर्षी प्रथमच प्रयत्न होता पहिल्या वर्षीच हा बहुमान मिळवला आहे.
