करमाळा

उभी पिके अन् पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी मायनस मध्ये गेलेल्या उजनी धरणाच्या पाण्याचे शासनाने तात्काळ योग्य नियोजन करावे- शंभूराजे जगताप

करमाळा प्रतिनिधी चालु वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने उजनी धरण अर्ध्यापेक्षा जास्त भरले नव्हते . त्यात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे उजनीच्या पाण्याने तळ गाठला आहे . मे महिना उलटून गेला तरी अद्याप समाधानकारक मान्सून पूर्व पाऊस पडला नाही उजनी पट्टयात उभी असलेली ऊस , केळी व इतर फळबागा पाण्याअभावी जळून जाण्याच्या स्थितीत आहेत . करमाळा शहरासह बऱ्याच शहरांना आठवडयातून एक -दोनदा पाणी पुरवठा होत आहे विहीरी व बोअरवेल्स ची पाणी पातळी घटली आहे . उजनी जलाशयाच्या वरील बाजूस असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणांमधून किमान १२ टीएमसी पाणी तात्काळ उजनी धरणात सोडण्यात यावे व शासनाने उजनीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी भाजपा जिल्हा यूवा मोर्चा चे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी निवेदनाद्वारे जलसंपदामंत्री तथा राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group