भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेतील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांना उत्कृष्ठ श्रेणी प्राप्त- प्रा.रामदास झोळ सर.

करमाळा प्रतिनिधी भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेतील तिन्ही औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांना महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण महामंडळाकडून उत्कृष्ठ दर्जाची श्रेणी प्राप्त झालेली आहे. याबद्दलचे परिपत्रक शासनाच्या संकेत स्थळावर 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे . तिन्ही महाविद्यालयांना उत्कृष्ठ श्रेणी प्राप्त झाली असल्याची माहिती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की दत्तकला शिक्षण संस्थेतील औषध निर्माण शास्त्र विभाग हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेला विभाग आहे. ग्रामीण भागात उत्कृष्ठ शिक्षण देणारी संस्था म्हणून दत्तकलेचा नावलौकिक आहे संस्थेच्या सचिव प्राध्यापक माया झोळ यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाने त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर आमच्या संस्थेतील तिन्ही औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांना उत्कृष्ट श्रेणी प्राप्त झाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमोल कुलकर्णी, दत्तकला औषध निर्माण विभागाचे प्राचार्य बाळासाहेब शिरस्कर, अनुसया औषध निर्माण शास्त्र विभागाचे चे प्राचार्य विशाल बाबर यांचे व सर्व प्राध्यापक वर्गाचे संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
