काॅंग्रेस सरकारसारखे मोदी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी- हरीभाऊ मंगवडे जिल्हा संघटक काॅंग्रेस ॲाय
करमाळा. प्रतिनीधी मोदी सरकारने भारतातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस आयचे संघटक हरीभाऊ मंगवडे यांनी केली आहे. देशामध्यै काँग्रेस पक्षाचे सरकार होते, त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील शेतकऱ्यांना 72 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती.. त्यावेळेस केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या दोघांनी मिळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता, आता भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्याला एक रुपयाची ही कर्जमाफी दिली नाही. म्हणून मोदी सरकारने भारतातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे असे आवाहन हरिभाऊ मंगवडे यांनी केले आहे.
