हर घर तिरंगा योजना शतप्रतिशत राबवून प्रत्येकाने उत्साहात सहभागी व्हावे-नरसिंह चिवटे एक हजार ध्वजाचे वाटप!!!
करमाळा (प्रतिनिधी)
येणाऱ्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकून देशाच्या प्रति आपली प्रेमाची भावना व्यक्त करून सुवर्ण महोत्सव साजरा करावा असे आवाहन स्वातंत्र्य सैनिक उत्तर अधिकारी अधिकारी संघटनेचे राज्य सचिव पत्रकार नरसिंह चिवटे यांनी केले
हाजी हाशमुद्दीन तांबोळी सामाजिक ट्रस्ट व एपीजे अब्दुल कलाम सोशल वर्क ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने घरघर तिरंगा योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जवळपास 1000 ध्वजाचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना नरसिंह चिवटे म्हणाले की स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे अपार उपकार आपल्या देशवासीयांवर आहेत या स्वातंत्र्यामुळेच आज आपण स्वाभिमानाने जगत असून याला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत यामुळे प्रत्येकाने स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी सर्वांनी घरघर तिरंगा योजना राबवावी.यावेळी नगरसेवक अल्ताफ शेख तांबोळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून ध्वजाचा कुठेही अवमान होणार नाही याची दखल प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन केले यावेळी फारूक जमादार समीर शेख अमीर शेख राजू बागवान सादिक काझी भाऊसाहेब सर्कल आदींनी मार्गदर्शन केले.
