करमाळाकृषी

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शुक्रवारी मौलाली माळ, करमाळा येथे दिग्विजय बागल आणि सिना कोळगाव धरणग्रस्त संघटना यांच्या वतीने करण्यात येणार आंदोलन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सर्व ठिकाणचा वीज पुरवठा ‌सुरळीत करण्यात यावा जर वीज पुरवठा ‌सुरळीत केला नाही तर शुक्रवारी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन भव्य आंदोलन सोलापूर-नगर हायवे येथील मौलाली माळ चौक, करमाळा येथे करणार असल्याचे बागल गटाचे नेते दिग्विजय बागल आणि धरणग्रस्त संघटनेचे नेते सतीश नीळ यांच्या नेतृत्वाखाली करणार असल्याचे सांगितले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना आपण उद्या स्वतः निवेदन देऊन भेटणार असल्याचे बागल म्हणाले. धरणग्रस्त संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील सर्वच भागांत वीज पुरवठा खंडित केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव यांचे अतोनात नुकसान होणार आहे. तसेच वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना व मुक्या जनावरांना पिण्यास पाणी मिळत नाही.याशिवाय सध्या साखर कारखाने सुरू झाले आहेत त्यामुळे तालुक्यातील सर्वच गावात ऊस तोडणी कामगार आलेले आहेत. त्यांनाही पिण्यास पाणी मिळत नाही.याशिवाय पूर्व भागांतील शेतकरी बांधव यांना गेल्या वर्षी पासून फक्त चारच तास वीज पुरवठा चालू होता. बील मात्र चोवीस तासांचे आकरलेले आहे. डी.पी.जळला तर आम्हा शेतकऱ्यांनाच त्याचा दुरुस्ती खर्च करावा लागतो आहे. तसेच मागील काही महिन्यांपूर्वीच आम्हा शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी वीज बिल भरलेले आहे. असे असतांनाही ऐन ऊस तोडणी सुरू होण्यापूर्वी पूर्वी वीज पुरवठा खंडित केलेला आहे त्यामुळे आमचे नुकसान होऊन ऊसाचे वजन घटणार आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच गेल्या एक वर्षापासून पासून कोरोना महामारीच्या काळात दूध, फळे,पालेभाज्या विक्रीस बाजार पेठा बंद होत्या त्यामुळे आमचा शेतीमाल रस्त्यांवर टाकून द्यावा लागला होता. याचा तरी आपण विचार केला आहे का? आम्हा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या घराची पडझड झाली होती त्यांना नुसता पंचनामा करून घेतला आहे. त्यांना अद्यापही शासनाने नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी बांधव पूर्ण दबून गेलेलो आहोत. त्यामुळे शासनाने आमच्या जखमेवर मीठ चोळू नये.आपण वीज बिल भरण्यासाठी वीज पुरवठा खंडित केलेला आहे तसाच वीज पुरवठा हि पूर्ण दाबाने दिला आहे का? काही प्रमाणात तरी दुरुस्ती खर्च केला आहे का ? साहेब, आपणास विनंती आहे की, आपण वरील परिस्थिती पाहता ऊस बील मिळे पर्यंत तरी वीज पुरवठा खंडित करू नये व वीज बिलात सवलत देण्यात यावी . वीज बंद काळातील बील माफ करावे.व खंडित केलेला वीज पुरवठा तात्काळ चालू करावा.
तरी आपण आमच्या मागणीचा विचार करून तात्काळ वीज पुरवठा चालू होणे विषयी आपल्या स्तरावरून सर्व सबंधित अधिकारी यांना आदेश द्यावेत हि विनंती अन्यथा आम्ही सर्व पक्षीय शेतकरी बांधव यांचे वतीने करमाळा येथील मौलाली माळ बायपास रोड येथे दि.२६/११/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता रस्ता रोको आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी वीज वितरण कंपनी व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी. या निवेदनावर मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप, युवासेनेचे संघटक शंभूराजे फडतरे, भारिपचे शहाजी ठोसर, बळीराजा संघटनेचे अण्णा सुपनवर सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवर यांच्या सह शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group