सकारात्मक

ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”पुस्तकअन् रोखठोक अजितदादा पवार!

*”ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”पुस्तक*
*अन् रोखठोक अजितदादा पवार!* नमस्कार,
“पुस्तकाच्या कव्हरचा रंग काळा का?”,असा सवाल महाराष्ट्राचे “रोखठोक” नेते विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मला केला आणि मी बुचकळ्यातच पडलो! मग काय,मुद्रण सौंदर्य आणि सुबकतेच्या अनेक निकषांचा आधार घेत अजितदादांचे समाधान होईल असे उत्तर मला द्यावे लागले.पण त्या नंतर मात्र त्यांनी आस्थेवाईकपणे पुस्तक चाळले आणि पुस्तकाचे कौतुकही केले.विधान भवनातील त्यांच्या दालनात आज माझे “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” हे पुस्तक व चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्राची फ्रेम माझ्या व दादांचे खाजगी सचिव माझे मित्र बंधू अविनाश सोलवट यांच्या हस्ते भेट देण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या ७५मान्यवरांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” हे माझे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्या पुस्तकातील व्यक्तिमत्त्वांत अजितदादांचाही समावेश आहे. पुस्तकात समाविष्ट व्यक्तिमत्त्वांची व्यक्तीचित्रे ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटली आहेत.पुस्तक व त्यांच्या रेखाचित्राची फ्रेम त्यांना भेट देण्यात आली.यावेळी तरुण उद्योजक अमोल पाटील, वकील अतुल पाटील आणि कुंदन हुलावळे हे उपस्थित होते.
*-राजा माने,*
संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ,
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.

error: Don\'t try to copy. Content is protected !!