करमाळासकारात्मक

वाशिंबेचे सुपुत्र अमित निमकर यांची कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी.
वाशिंबे ता. करमाळा येथील अमित तानाजी निमकर यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई येथे कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती झाली आहे. त्यांचा हा प्रवास करमाळा वासीयांसाठी प्रेरणादायी आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांना बढती मिळाली असून बांधकाम विभागाने बढतीचे आदेश काढले आहेत. ते सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता पदी कर्जत जिल्हा अहमदनगर येथे कार्यरत होते. अमित निमकर हे 2010 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते.त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग करमाळा जि.सोलापूर येथे उपअभियंता म्हणून 2012 ते 2014 पर्यन्त काम केले नंतर 2014 ते 2020 पर्यंत सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा या ठिकाणी काम केले ,करमाळा या ठिकाणी काम करताना त्यांनी तालुक्यातील अनेक प्रलंबित कामे पोमलवाडी पूल ,केतूर पूल तसेच कोर्टी टाकळी रस्ता ,जेऊर ग्रामीण रुग्णालय ,जातेगाव ते टेम्भूर्णी रस्ता दुरुस्ती अशी महत्वाची कामे गुणवत्तापूर्वक करण्यात योगदान दिले .त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना 2019 मध्ये उत्कृस्ट अभियंता पुरस्कार जाहीर केला .ते सामाजिक कामातही अग्रेसर होते ,सध्या ते मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष या पदी काम करत आहेत .त्याच्या कामाची दखल घेऊन आमदार रोहित पवार यांनी त्यांना कर्जत ला घेतले होते ,ते कर्जत याठिकाणी 2020 ते आजपर्यंत कार्यरत होते ,त्या ठिकाणीही त्यांनी अल्पावधीत कामाची चुणूक दाखवली .त्यांच्या पदोन्नतीबद्दल करमाळा बांधकाम उपविभाग तर्फे सत्कार करण्यात आला .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group