करमाळा

मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी 6 मार्च रोजी करमाळा बंदचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी :- मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अमानुषपणे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ व माजी मंत्री धनंजय मुंडेना मुख्य सुत्रधार करुन गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी स्वंयमफुर्तीने करमाळा शहर व तालुका गुरुवार दिनांक ६/०३/२०२५ रोजी बंद ठेवणे बाबतचे निवेदन तहसिलदार यांना सकल मराठा समाज करमाळा व बहुजन बांधव करमाळा यांच्यावतीने देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये विविध मागण्या करीत करमाळा शहर व तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे
१) मस्साजोग घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांना मुख्य सुत्रधार आरोपी करण्यात यावे.
२) स्व. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा मिळावी.
३) स्व. संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. आरोपींचे व्हि. डी.ओ. फोटो कोर्टात आरोप पत्रात दाखल केलेले आहेत हाच ठोस पुरावा आहे.४) स्व. संतोष देशमुख यांची ज्याप्रकारे आमानुषपणे कपडे काढुन मारहाण केली, तसेच निच प्रवृत्तीच्या आरोपींनी स्व. संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे व्हि. डी.ओ. कॉल करुन व व्हि. डी.ओ. काढून कोणाकोणाला पाठविले त्या सर्वांना आरोपी करावे.
५) स्व. संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना स्व. संतोष देशमुख यांनी पाणी मागितल्यावर त्यांच्या तोंडात लघुशंका करण्यात आली ज्या आरोपींनी हे कृत्य केले त्या आरोपीचे गुप्तांग काढण्यात यावे.
वरील सर्व मागण्या महाराष्ट्र शासनाने कोणासही पाठीशी न घालता पुर्ण कराव्यात असेही निवेदनात म्हटले आहे. मस्साजोग येथील घडलेली घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी प्रवृत्ती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुळासकट संपवावी. स्व संतोष देशमुख यांना मारत असताना आरोपी ज्या प्रकारे मारताना आनंद घेत होते ही खरोखर किती क्रूरतेची बाब असल्याने अशा अमानुष कृत्याचा निषेध म्हणून सकल मराठा समाज करमाळा व बहुजन बांधव करमाळा यांच्या वतीने करमाळा शहर व तालुका बंद व ठेवत असल्याचे सांगण्यात आले तसेच सदर निवेदनाच्या प्रती सकल मराठा बहुजन बांधव
करमाळा यांच्या वतीने करमाळा शहर व तालुका बंद व ठेवत असल्याचे सांगण्यात आले तसेच सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व गृहमंत्रालय महाराष्ट्र राज्य दोन्ही उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पोलीस अधिक्षक सोलापूर, करमाळा पोलीस ठाणे करमाळा याना पाठविण्यात आल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group