ताज्या घडामोडी

बार्शी वगळता ईतर तालुक्यातील रूग्ण ॲडमीट करून घेणार नाही दुर्दैवी निर्णय :- संजय (बापु) घोलप*

*बार्शी वगळता ईतर तालुक्यातील रूग्ण ॲडमीट करून घेणार नाही दुर्दैवी निर्णय :- संजय (बापु) घोलप*

(मा.जिल्हाअधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी )

करमाळा प्रतिनिधी. दि.20 एप्रिल रोजी बार्शी येथे बार्शी तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन एक निर्णय घेतला आहे. तो निर्णय असा की ‘बार्शी वगळता इतर तालुक्यातील कोणतेही रुग्ण बार्शी मध्ये ऍडमिट करून घेतले जाणार नाहीत’ .

तरी आम्ही आपल्याला विनंती करतो की हा निर्णय हा माणुसकीला धरून नसून सर्वसामान्य गरीब कुटूंबातील लोकांच्या जीवाशी खेळणारा निर्णय आहे.संविधानाची पायमल्ली करणारा हा निर्णय असून भारतीय म्हणून आणि करमाळा तालुक्यातील नागरिक संजय( बापु )घोलप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा करमाळा तालुका अध्यक्ष म्हणून मी या निर्णयामुळे करमाळा तालुक्यातील रुग्णांबाबतीत चिंता व्यक्त करतो.

आणि त्याचप्रमाणे आपल्या करमाळा तालुक्याने भविष्यात कोणत्याही इतर तालुक्यांवर अवलंबून न राहण्यासाठी आपण करमाळा तालुक्यात लवकरात लवकर वैद्यकीय सेवा तयार कराव्यात आणि आपल्या तालुक्यातील रुग्णांना योग्य ती सेवा द्यावी त्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक कायम आपल्या सोबत आहोत.

आपण लवकरात लवकर बार्शीच्या या निर्णयाला स्थगिती देऊन तो निर्णय मागे घेण्यास तिथल्या लोकप्रतिनिधी यांना भाग पाडावे ही आपणास मी नम्र विनंती करतो.अन्यथा या निर्णयाच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.

जय महाराष्ट्र जय मनसे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group