करमाळासकारात्मक

बाळासाहेबांची शिवसेना सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारी संघटना.  – प्रा. शिवाजीराव सावंत

 

करमाळा प्रतिनिधी दिवाळीच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने फराळ पार्टीचे आयोजन करून सामाजिक सलोखा वाढविण्याचे काम केले आहे हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकात विश्वासाचे वातावरण ठेवून देशाची प्रगती करावी असे आव्हान बाळासाहेब शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले

मोहल्ला विभाग करमाळा येथे अंशा मज्जित मध्ये फराळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते
प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे रामभाऊ  ढाणे अफसर जाधव उपस्थित होते
करमाळा नगरीचे माजी नगरअध्यक्ष शौकत नालबंद समाजसेवक कलीम काझी अमीर अल्ताफ तांबोळी फारुख जमादार फारूक बेग पत्रकार नासिर कबीर आझाद शेख अमीर शेख जुनेग बागवान अलीम बागवान आधी सह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव होते यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील उपशहर प्रमुख नागेश गुरव राजेंद्र काळे शहरप्रमुख संजय शीलवंत उपशहर प्रमुख पिंटू गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की समाजात समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण करून राजकीय फायदा घेतला जातो
यामुळे हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकावर विश्वास व एकमेकात संवाद ठेवून काम केल्यास विघातक प्रवृत्ती नक्की बाजूला राहील

बोलताना पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे म्हणाले की करमाळा सामाजिक सुलोख्या बाबतीत अत्यंत उत्तम उदाहरण असून गणपती उत्सवाच्या मिरवणूक वर मशिदीमधून गणपती बाप्पा मूर्तीवर फुले टाकली जातात तर मुस्लिम धर्मियांच्या सर्व उत्साहात हिंदू बांधव सहभागी होतात असेच वातावरण संपूर्ण देशात निर्माण झाले तर जातीय दंगली होणार नाही
आज दिवाळीचे निमित्ताने समाजातील नागरिकांसाठी आयोजित केलेली फराळ पार्टी आदर्श उपक्रम असून असा उपक्रम गावोगावी झाला पाहिजे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group