करमाळाताज्या घडामोडीराजकीय

करमाळा तालुका शिवसेना प्रवक्ते पदी ॲडवोकेट शिरीष लोणकर यांची निवड

 

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका शिवसेनेच्या प्रवक्तेपदी करमाळ्यातील प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट शिरीष लोणकर यांची निवड झाली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे .एडवोकेट लोणकर हे केंद्र शासन नियुक्त नोटरी प्राप्त वकील असून त्यांनी करमाळा तालुक्यातील आदिनाथ साखर कारखाना मकाई साखर कारखाना कमलादेवी औद्योगिक वसाहत आधी महत्त्वाच्या संस्थेवर कायदे सल्लागार म्हणून काम केले आहे करमाळा बार असोसिएशनची ते माजी अध्यक्ष असून करमाळा तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य आहेत
त्यांच्या पत्नी करमाळ्याच्या माजी नगरसेविका आहेत एडवोकेट शिरीष लोणकर यांचा करमाळा तालुक्यात दांडगा जनसंपर्क असून याचा फायदा शिवसेनेला होणार असल्याचे विश्वास उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे शहरप्रमुख संजय शिलवंत उपशहर प्रमुख राजेंद्र काळे नागेश गुरव गायकवाड युवा नेते देवानंद बागल शिवसेना शाखाप्रमुख आजिनाथ इरकर यांनी विश्वास व्यक्त केला आहे

या निवडीनंतर बोलताना एडवोकेट लोणकर म्हणाले की करमाळा शहर व तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न रखडलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत विशेषता येणाऱ्या काळात करमाळा नगरपालिकेच्या दृष्टीने वीस वार्डात स्वबळावर 20 शिवसेनेचे उमेदवार उभा करण्याची तयारी आम्ही करीत असून इच्छुकांनी माझ्याशी व शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधा असे आव्हान एडवोकेट शिरीष लोणकर यांनी केले आहेकरमाळा शहरातील शिवसेनेची संघटन मजबूत करण्यासाठी युवा सेना महिला आघाडी प्रभाग प्रमुख आदीपदावर पदाधिकारी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी शिवसेना कार्याशी संपर्क साधावा असे आवाहन एडवोकेट लोणकर यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group