सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी मुकुंद साळुंके सर यांची निवड*
करमाळा प्रतिनिधी मोहोळ येथे जिल्ह्याचे जेष्ठ शिक्षक नेते तथा पुणे विभागीय अध्यक्ष मा. शिवाजीराव जमाले सर यांचे अध्यक्षतेखालीसोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व सोलापूर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी ची त्रैवार्षिक निवडणूका बिनविरोध झाल्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली
टी.डी.एफ.च्या अध्यक्ष पदी श्री.हरीदास जाजणूरे सर कार्याध्यक्षपदी मोहनराव गायकवाड, सचिव पदी हनुमंत जोडबोटे , कोषाध्यक्ष मकरंद अंकलगी यांची एकमताने निवड करण्यात आली
तसेच सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्षपदी सांगोला चे भारत इंगवले सर, कार्याध्यक्षपदी मुकुंद साळुंखे सर
सचिवपदी सचिन झाडबुके सर कोषाध्यक्ष गणेश यादव मंगळवेढा यांची एकमताने निवड करण्यात आली.
या वेळी जेष्ठ मुख्याध्यापक तुकाराम मेटकरी सर, विजय वाघमोडे सर ,निळकंठ लिंगे, नेताजी गाडेकर, बाळासाहेब भिसे सर ,शिवशरण सर, मोहोळ चे संभाजी वागज सर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली व योग्य नियोजन केलं तसेच नवोदित पदाधिकारी यांचे यथोचित सत्कार करण्यात आले
यावेळी जिल्ह्यातून जवळपास शंभर शिक्षक उपस्थित होते
सर्वांचे आभार विजय वाघमोडे सर यांनी मानले.
