घारगावचे सुपुत्र विशाल सरवदे याच्या जिद्दीला सलाम
करमाळा प्रतिनीधी घारगाव चे सुपुत्र विशाल सरवदे त्यांच्या जिद्दीला सलाम एका हाताने व पायाने 50 टक्के अस्थिव्यंग असून देखील लहान मनापासून जे मनामध्ये बाळगले ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द् युवापिढीसमोर आहे.
*व्यसनाधीन* ही शॉर्टफिल्म तयार केली यातून समाज जागृत व्हावा व व्यसन सोडून व्यसनमुक्त व्हावा समाजामध्ये जनजागृती व्हावी तरुण पिढी व्यसनाधीन होऊन बरबाद होत चाललेली आहे बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त होत चाललेले आहेत आपल्या कुटुंबाची काय अवस्था होते या फिल्ममध्ये पहावी या हेतूने बनवलेली आहे ही शॉर्ट फिल्म पाहून नक्कीच तरुण पिढी बाहेर पडेल व व्यसनमुक्त होईल यातून तरुण पिढीने बोध घ्यावा व व्यसनमुक्त व्हावे असे आवाहन विशाल सरवदे यांनी केले आहे.
