दत्तकला आयडियल इंग्लिश मेडियम स्कुल केत्तुरमध्ये. दहावीच्या परीक्षेत किरण खटके प्रथम दत्तकलेच्या 100% निकालाची यशस्वी परंपरा कायम
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल 29 जुलै रोजी जाहीर झाला असून यामध्ये करमाळा तालुक्यातील दत्तकला आयडियल स्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज. केत्तुर नं 1 या विद्यालयाचा 100% निकाल लागला आहे. व दरवर्षीप्रमाणे विद्यालयाने.100% निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.
यामध्ये दत्तकला सेमी इंग्लिश स्कुलच्या केत्तुर येथील विद्यालयामधुन

प्रथम क्रमांक कु. खटके किरण भागवत (90.40)

द्वितीय क्रमांक झोळ आश्लेषा विलास (89.20)

तृतीय क्रमांक कु.निकत अतिश आबासो 88.60 तसेच. 85%. पेक्षा जास्त मार्क मिळवणारे. विद्यार्थी असून यामध्ये कु.येडे पायल विजय (87.40%) कु.मोटे किरण काकासाहेब (85.60
कु.दुरंदे निखिल बिभिषण (85.40%) विद्यालयाच्या या यशाबद्दल पालक वर्गातुन समाधान व्यक्त करण्यात आले असुन व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुणवंत शिक्षकांचे कौतुक दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर तसेच संस्थेच्या सचिव प्रा. माया झोळ मॅडम व स्कुलच्या संचालिका सौ.नंदा ताटे मॅडम व प्राचार्य श्री.मारकड सर यांनी अभिनंदन केले आहे.
