Saturday, April 26, 2025
Latest:
करमाळा

उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार आ. मा.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्य ५०% सवलतीच्या दरात साहित्य वाटप या कार्यक्रमाचे उद्घघाटन


करमाळा प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व आ. मा.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्य ५०% सवलतीच्या दरात एल.ई.डी टिव्ही,सायकल,आणि वॅाटर फिल्टर वाटप या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा.श्री.संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी आमदार शिंदे बोलताना म्हणाले की,माझे कार्यकर्ते बोरगावचे सरपंच विनय ननवरे व राष्ट्रवादी युवक कोंग्रसचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार यांनी माझे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा अभिनव उपक्रम करमाळा शहर व तालुक्यांतील लोकांसाठी राबवला आहे या उपक्रमांचा तालुक्यांतील जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा व पुढील काळात असे लोकउपयुक्त उपक्रम राबवावे माझे आपणांस पुर्ण सहकार्य राहिल.
यावेळी माजी जि.प.सदस्य उद्धव माळी,वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ,मांगी विकास सोसायटीचे चेअरमन सुजित बागल,मकाईचे माजी संचालक विवेक येवले,करमाळा अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन महादेव फंड,नगरसेवक प्रविण जाधव,नगरसेवक अतुल फंड,भोसेचे सरपंच भोजराज सुरवसे,राष्ट्रवादी युवती कोंग्रेसच्या ता.अध्यक्षा शितलताई क्षीरसागर,पाडळीचे माजी सरपंच गौतम ढाणे,श्रीदेवीचामाळ सरपंच महेश सोरटे,बोरगाव शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष परमेश्वर भोगल,राखवाडीचे सरपंच किरण फुंदे,सावडीचे सरपंच भाऊसाहेब शेळके,सामाजिक कार्यकर्ते बापु तांबे,राष्ट्रवादी युवक कोंग्रेस ता.उपाध्यक्ष सुरज ढेरे,सोशल मिडिया ता.अध्यक्ष राजेंद्र पवार तसेच शहर व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group