Uncategorized

करमाळा येथे लघु पशु चिकित्सालयास परवानगी द्यावी भाजपाचे नरेंद्र सिंह ठाकूर यांची पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाची मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पशुधनाला योग्य आरोग्य उपचार मिळत नसल्यामुळे पशुपालक संकटात सापडले असून तसेच रक्त, लघवी, सोनोग्राफी अशा वेगवेगळ्या तपासण्या करण्यासाठी शेजारील तालुक्याच्या ठिकाणी किंवा खाजगी लँब मध्ये जावे लागत आहे त्यामुळे करमाळा येथे लघू पशू चिकीत्सालयास मंजूरी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस नरेंद्र ठाकूर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात ठाकूर यांनी म्हटले आहे की पशुपालन व्यवसाय हा संकटात आहे. त्यामध्ये जनावरांवर उपचार करण्यासाठी पर जिल्ह्यात जावे लागते. परिणामी अधिकचे पैसे मोजावे लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांचे पशुधन ही संपती असल्याने त्यांचे आरोग्य अबाधित राहिल्यास त्यांच्यापासून आर्थिक लाभ होतो. त्यामुळेच जनावरे आजारी पडल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार होने गरजेचे असते. यासाठी सरकारने शासकीय यंत्रणा उभारली आहे. मात्र करमाळा तालुक्यात पशू चिकित्सालयात नसल्याने पशूपालकांची व जनावरांची परवड होत आहे. त्यामुळे पशू चिकित्सालय उभारण्याची मागणी सातत्याने होत आहे.२०१९ पशुगणनेनुसार सध्या तालुक्यात १ लाख ५० हजार २६० पशुधनाची संख्या आहे. यात गाय-बैल ६४ हजार ३६, रेडे-म्हैस २७ हजार४६४, शेळ्या ५२ हजार २२४, मेंढर ६ हजार १३०, वराह ४०६ याप्रमाणे आहेत. तालुक्याच्या ठिकाणी लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय झाल्यास सर्वच जनावरांना सोनोग्राफी, क्ष-किरण, रक्त तपासणी सेवा यासारख्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होतील त्यामुळे आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.पशूपालकांना सोनोग्राफी, रक्त, क्ष-किरण तपासणी करण्यासाठी राशीन, इंदापूर, अकलूज अशा ठिकाणी जावे लागत आहे. तसेच गंभीर समस्या निर्माण झाल्यास शस्त्रक्रियेसाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे करमाळा येथे लघु पशू चिकित्सालय करावे – – – (नरेंद्रसिह ठाकूर जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी )

error: Don\'t try to copy. Content is protected !!