करमाळा तालुक्यातील नोटरीपदी नियुक्ती झालेल्या वकिलांचा बार असोसिएशनच्यावतीने सत्कार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील वकिलाची भारत सरकारचे नोटरी पब्लिक पदी नुकतेच ॲड. डी.एम. सोनवणे, ॲड. रवींद्र बर्डे, ॲड. ए.पी. कांबळे, ॲड. एम.डी. कांबळे, ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. अजित विघ्ने, ॲड. अलीम पठाण, ॲड. योगेश शिंपी, ॲड. प्रवीण देवकर, ॲड. भाग्यश्री मांगले-शिंगाडे यांच्या निवडी जाहीर झाल्या. त्या निमित्ताने करमाळा बार असोसिएशन तर्फे त्यांचा सत्कार आयोजित केलेला होता. सत्कार प्रसंगी ॲड. हिरडे, ॲड. लोंढे, ॲड. राऊत, ॲड. सविता शिंदे, ॲड. सय्यद यांचे शुभेच्छापर भाषणे झाली. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे, नवनाथ राखुंडे, अजित विघ्ने यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन बारचे सचिव ॲड. विनोद चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. सुहास मोरे यांनी केले.
