Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

करमाळा तालुक्यात प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाल्याचा आनंदोत्सव होणार साजरा

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील प्रत्येक घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असुन प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार समीर माने व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे. महसूल, ग्रामविकास, पोलिस प्रशासन व कृषी विभागासह सर्व प्रशासकीय विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने नागरिकांना तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहावी म्हणून ‘हर घर झंडा’ मोहीम राबविण्यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण केंद्र सरकारच्या वतीने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर झंडा’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱी मिलींद शंभरकर यांनी सूचना केल्या आहेत.
प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा उभारत असताना ध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोठेही राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सदरचा ध्वज हा नाममात्र रक्कम रूपये 30 मध्ये नागरिकांना आपल्या ग्रामपंचायतमध्ये तसेच तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर ठिकाणी नागरिकांनी आपली नोंदणी करावी.हर घर झंडा’ हा कार्यक्रम सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, महिला बचत गट, अंगणवाडी, विवीध स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य व समन्वयातून नागरिकांनी यशस्वी करण्यासाठी आपले योगदान स्वयंस्फूर्तीने द्यावे, असे आवाहन तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी मनोज राऊत, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group