करमाळा

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची दिवेगव्हाण येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार 23 मार्च रोजी जाहीर सभेचे आयोजन

केतुर प्रतिनिधी अभय माने  मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची दिवेगव्हाण (ता. करमाळा) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार (ता. 23) रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील दिवेगव्हाण येथील नव्यानेच बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील सुमारे 70 एकर क्षेत्रावर या सभेचे आयोजन करण्यात आले असून, सभेसाठी मैदान तयार करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्याने यावेळी म्हणून जरांगे पाटील काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात प्रथमच एवढी मोठी सभा होत असल्याने सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाले परंतु, सगे सोयऱ्यांचा अध्यादेशास आद्यपही कायदेशीर मंजुरी मिळालेली नाही. सगेसोयरे अध्यादेशाला कायदेशीर मंजुरी मिळावी अशी आग्रही मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. यापूर्वी तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील वांगी येथे पहाटे चारच्या सुमारास जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली होती.या सभेसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दिवेगव्हाण आयोजकांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group