दत्तकला आयडियल स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज केत्तुर नं 1चा सलग पाचव्या वर्षी 100% निकाल विज्ञान शाखेत करमाळा तालुक्यांमध्ये दत्तकलेच्या पाचही मुली प्रथम
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा आज निकाल जाहीर झाला यामध्ये दत्तकला आयडियल स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज केत्तुर नं 1 या कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल सलग पाच वर्ष 100% निकाल लागला आहे व त्यामध्ये पुन्हा एकदा यावर्षी ही तालुक्यांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.
यामध्ये विज्ञान शाखेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक
1) कु. पानसरे विद्या किसन (87.53%)

2)कु.महाकाल प्राची अरुण (87.53%)

या दोन विद्यार्थ्यांनी पटकावला आहे, व द्वितीय क्रमांक
कु.शिंदे दिप्ती मोहन (86.46%)

तसेच तृतीय क्रमांक
कु.नाळे प्राजक्ता रामचंद्र (86.15%)

हिने पटकावला आहे.
ग्रामिण भागातील मुलींसाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला आयडियल स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज हे खुप चांगले शैक्षणिक व्यासपीठ बनले आहे कारण केत्तुर सारख्या खेडे गावात कसलीही ट्युशन व इतर तासिका न लावता कु.कोकणे पायल भाऊसाहेब (85.53%) व कु.कोकणे नम्रता देविदास (85.23%) मार्क मिळवुन उत्तीर्ण झाल्या आहेत हे खुप कौतुकास्पद आहे
तसेच एकुण 60 विद्यार्थ्यांन पैकी 32 विद्यार्थी हे 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळवुन उत्तिर्ण झाले आहेत व 16 विद्यार्थी हे 75% पेक्षा मार्क्स मिळवुन उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच क्राॅप सायन्स विषयांमध्ये 200 पैकी 199 मार्क्स कु.पानसरे विद्या किसन या विद्यार्थ्यांनीने मिळवले आहेत
त्याचबरोबर
कु.नवले अमृता सुधाकर (198/200)
कु.शितोळे निखिल रत्नाकर (198/200)
कु.कोकणे पायल भाऊसाहेब (197/200) मार्क मिळवुन उत्तिर्ण झाल्या आहेत.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल पालक वर्गातुन समाधान व्यक्त करण्यात आले व सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व गुणवंत शिक्षकांचे कौतुक दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर तसेच संस्थेच्या सचिव प्रा. माया झोळ मॅडम व स्कुलच्या संचालिका सौ.नंदा ताटे मॅडम व प्राचार्य श्री.मारकड सर यांनी अभिनंदन केले आहे.
