हवामानात वेगाने बदल : कधी ढगाळ हवामान. कधी कडाक्याची ऊन .. तर कधी पाऊस…
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यात वातावरणात अचानक बदल होत आहे कधी पाऊस तर कधी कडाक्याचे ऊन असे विरोधी वातावरण तयार होत आहे.
ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या उकाड्यात वाढ झाली आहे तर अचानक पावसाळी वातावरण तयार होत आहे काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उकाडा वाढत आहे.गणेशोत्सवाच्या प्रारंभापासून पावसाळी वातावरण तयार होत आहे दोन दिवसापूर्वी लक्ष्मीपूजनाच्या (गौरी) दिवशी तालुक्याच्या काही भागात पावसाने झोपून काढले होते. सध्या कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले आहे त्याचप्रमाणे रात्रीच्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानही सरासरीच्या पुढे जात असल्याने उकाड्यात मोठी वाढ होत आहे.
तालुक्याचे काही भागात पाऊस होत असला तरी, उकाडा मात्र कायम आहे. वातावरणात अचानक बदलाचा परिणाम उभ्या पिकावर होऊ लागला आहे पिकावर रोगराई वाढली आहे कधी ऊन.. कधी पाऊस.. तर कधी ढगाळ वातावरण.. यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे.यवतमाळ भागावरही परिणाम होत आहे.
