Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यावतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट भोजनाची सोय करमाळा पोलीसांनी पाळला माणुसकीचा धर्म

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सीना नदीला पूर आल्यामुळे ‌ येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन त्यांचे संसार उघड्यावर आले अशा शेतकऱ्यांना माणुसकीच्या मदतीचा हात म्हणून सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून करमाळा तालुक्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्याची किट व जेवण मौजे आवटी संगोबा निलज तरडगाव येथील पूरग्रस्त नागरिकांना देण्यात आले यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा, पोलीस निरीक्षक रंणजीत माने उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील पूरग्रस्तांना या संकट काळात पोलीस बांधवाकडून केलेल्या मदतीचे करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांनी कौतुक केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!