ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*
*
करमाळा प्रतिनिधी : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय सरडे याने कुस्तीमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडली आहे. १७ वर्षे वयोगटातील ५५ किलो वजन गटात राम धनंजय सरडे याची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रामने कुस्तीच्या मैदानावर दाखवलेली जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट खेळकौशल्य यामुळे त्याने ही निवड सार्थ ठरवली. अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी प्रगती करावी, यासाठी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीने सातत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच एक सुंदर परिणाम म्हणून रामने मिळवलेले हे यश संस्थेसाठी अभिमानाची बाब ठरले आहे.रामच्या या यशामुळे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक व क्रीडाप्रेमींकडून त्याचे कौतुक होत आहे.कुस्तीच्या पुढील स्पर्धेतही रामने उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या तालुक्याचे तसेच ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आला


