आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बागल गटाची सत्ता हस्तगत करण्यासाठी किंगमेकर म्हणून भुमिका महत्वाची निर्णायक ठरणार
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार होणार असल्याची चित्र सध्या निर्माण झाले आहे. प्रचार शिगेला पोचला असून आरोप प्रत्यारोपची मोठी शर्यत यामध्ये लागली आहे. विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी स्वतःचे अस्तित्व पणाला लावून आपले वडील कैलासवासी कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी उभा केलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना कुठल्याही परिस्थितीत आपल्या ताब्यात आला पाहिजे तसेच शेतकरी कामगार यांच्या हितासाठी तो सहकारी राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून संजीवनी पॅनल उभा करून या निवडणुकीमध्ये आवाहन उभा केले आहे
. नामदार शरदचंद्र पवार साहेब मोहिते पाटील प्रा. राम शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सहकार्याने आदिनाथ निवडणूक जिंकण्याचा व कारखाना चालवण्याचा त्यांचा मानस आहे.तर माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आदिनाथ बचाव पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये आपले अस्तित्व दाखवून आदिनाथ निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे. महायुती घटक पक्षाचा फायदा आपणास होईल तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही मै हु ना ही भावनिक साथ घातल्यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे. तर या निवडणुकीत प्रथमच दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून आदिनाथ शेतकरी विकास पॅनल द्वारे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक लढवत आहेत आदिनाथ सहकारी साखर कारखाना म्हणजे बागल गटाचा एक बालेकिल्ला म्हटले तर वाव ठरणार नाही कारण या कारखान्याच्या जोरावरच बागल गटांनी करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मकाई नगरपालिका कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत यश मिळवले आहे परंतु आदिनाथ कारखाना मागील सात ते आठ वर्षापासून कर्जाच्या विळख्यात सापडल्यामुळे विरोधकांनी त्याचा मुद्दा करून प्रत्येक निवडणुकीला बागल गटाला कोंडीत पकडण्याचे काम केले असल्यामुळे बागल गटांनी यावेळी मात्र आपला पत्ता ओपन न करता बघू तुम्ही चालवा आम्ही तुम्हाला सहकार्य करू असे जाहीर करत या निवडणुकीमध्ये विरोधकांनाच गुगली टाकण्याचे काम केले आहे. राज्यामध्ये महायुतीचे सरकार असून बागल गट नेत्या रश्मी दिदी बागल या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत तर दिग्विजय बागल हे एकनाथ शिंदे शिवसेना नेते आहेत त्यामुळे महायुतीचा वरदस्त त्यांना मिळाला आहे तर आमदार संजयमामा शिंदे हे जरी अपक्ष असले तरी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक असून या निवडणुकीमध्ये महायुतीचा त्यांनाही पाठिंबा मिळाला असून भाजप शिवसेना यांचे पाठबळ त्यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून कारखाना चालवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.तर विद्यमान आमदार नारायण आबा पाटील हे शरद पवार गटाचे आमदार असले तरी प्राध्यापक राम शिंदे मोहिते गट यांच्यामुळे त्यांनाही या निवडणुकीत आदिनाथ कारखान्याबाबत सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. नारायण आबा पाटील यांनी आपली आमदारकी पणाला लावून आदिनाथ चालवण्यासाठी आपण कुठल्याही पक्षाचे सहकार्य घेऊन कारखाना चालवणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने शेतकरी सभासद यांच्या मतदानावर अवलंबून आहे तर सत्तेची चावी खऱ्या अर्थाने बागल गटाकडे आहे बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे सर हे खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जातात त्यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये बागल गट कोणाला सहकार्य करणार यावर खऱ्या अर्थाने निवडणुकीत मिळणारे यश अवलंबून आहे. बागल गट ज्याच्या बाजूने आपला पाठिंबा देईल तोच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एक हाती सत्ता स्थापन करून सत्ता मिळवणार आहे. एकंदर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची यशाची गुरुकिल्ली बागल गटाकडे असल्याने बागल गट जरी निवडणूक लढवत नसला तरी त्यांना मानणारा मतदार खऱ्या अर्थाने आपल्या नेत्याच्या आदेशानुसार मतदान करणार आहे. त्यामुळे आदिनाथच्या निवडणुकीची सत्तेची चावी बागल गटाकडे असल्याने त्यांची मन धरणी करून खऱ्या अर्थाने कोण यश मिळवतो हे येणारा निकाल आपणास सांगणार आहे.
