करमाळा

पंचवीस वर्षे बंद असलेली रेशन कार्ड वाटपाची मोहीम पुन्हा सुरू करा -मा.सरपंच.श्री.औदुंबरराजे भोसले

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील वर्षे बंद असलेली रेशन कार्ड वाटपाची मोहीम पुन्हा सुरू करा  अशी मागणी नेरलेचे मा.सरपंच.श्री.औदुंबर राजे भोसले यांनी केली आहे.
तहसील कार्यालय मार्फत प्रत्येक  नविन रेशन कार्ड वाटप करण्याची मोहीम,तलाठी स्वस्तधान्य दुकानदार,कोतवाल यांच्यामार्फत सन.1997 ते 2000 पर्यंत देश स्वातंत्र्या पासून राबवली जात होती.त्या माध्यमातून जन्मलेल्या बालकांचा,लग्न होऊन आलेल्या महिलेचा, शिधापत्रिकेत नाव समाविष्ट केले. नवीन वास्तव्यास आलेल्याना नवीन कार्ड दिले जायचे व मयत झालेल्या व लग्न होऊन परगावी गेलेल्या,नोकरी व्यवसाय निमित्त परगावी गेलेल्यांची नावे कमी केली जात होती.प्रत्येक कुटुंबाकडून फॉर्म भरून शिधापत्रिकेची सरकारी फी घेऊन नवीन शिधापत्रिका दिली जायची त्यामुळे नागरिकांना तहसील कार्यालय येथे येण्याची गरज पडत नसे.एखाद्या व्यक्तीला तात्काळ नाव कमी करण्याचे किंवा वाढवण्याची गरज असेल तरच तहसील कार्यालय येथे जात असे त्यामुळे अधिकारी कर्मचारी किंवा नागरिकांना देखील त्रास होत नव्हता,सन 1997-98 साली दारिद्र रेषेचा सर्वे होऊन यादीतील लोकांना पिवळे रेशन कार्ड व इतरांना केसरी कार्ड 2000 साली वाटप केले.कार्ड संपल्यामुळे पुरवणी देण्यात येत आहे.त्यानंतर पंचवीस वर्ष कार्ड वाटप न केल्यामुळे प्रत्येक कार्डधारकाला तहसील पुरवठा कार्यालय येथे जाऊनच अर्ज करावा लागत आहे.अर्ज केल्यानंतर वर्ष वर्ष दोन दोन वर्षे हेलपाटे घालून देखील त्यांना नवीन कार्ड,नाव समाविष्ट करणे,कमी करणे अशी कामे होत नाहीत. आज कार्ड संपूर्ण जीर्ण झाली आहेत.काही नागरिक वृद्धपणामुळे पैशाअभावी करमाळा येथे जाऊन अर्ज करू शकत नाहीत.त्यामुळे पंचवीस वर्षापासून त्यांचे कार्ड बंद आहेत.ते धान्यापासून व इतर लाभापासून वंचित आहेत.विनाकारण नागरिक, अधिकारी,कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे.ती मोहीम पुन्हा चालू करून नागरिकांचा त्रास कमी करावा अशी मागणी नेरले ता करमाळा ग्रा.पं.माजी सरपंच,श्री.औदुंबरराजे भोसले यांनी केली लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!