Wednesday, April 23, 2025
Latest:
आरोग्यकरमाळा

परांडा येथे होणाऱ्या आरोग्य शिबिरासाठी रुग्णांची येण्या जाण्याची व्यवस्था प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातून 5000 रुग्णांना नेण्याची व्यवस्थारुग्णांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

करमाळा प्रतिनिधी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा येथील राज्यस्तरीय आरोग्य शिबिर 27 नोव्हेंबर रोजी होत असून या आरोग्य शिबिरात500 तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांची तपासणी केली जाणार असून सगळ रुग्णांना औषधोपचार शस्त्रक्रिया सुद्धा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे
या आरोग्य शिबिरासाठी जाण्यासाठी करमाळा तालुक्यातील प्रत्येकगावातून वाहनाची व्यवस्था करण्यात येणार असून आरोग्य शिबिराचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी आपली नाव नोंदणी करमाळा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात करावी असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे

परंडा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आरोग्य शिबिराचे नियोजन बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी बंगार्डे मॅडम सह आरोग्य खात्याचे प्रमुख अधिकारी तालुकाप्रमुख देवानंद बागल उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील उपतालुकाप्रमुख दादा थोरात प्रशांत नेटके डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर कारंडे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे शिवसेना शहरप्रमुख संजय शीलवंत उपशहर प्रमुख राजेंद्र काळे नागेश गुरव पिंटू गायकवाड शिवसेना वैद्यकीय तालुका समन्वयक दीपक पाटणे करमाळा कक्ष प्रमुख रोहित वायबसे कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे हिवरवाडी अजिनाथ इरकर रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण मोहल्ला अध्यक्ष अनिस कबीर युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शाखाप्रमुख सुरज कांबळे मनोज चिवटे शिवसेना प्रवक्ते एडवोकेट शिरीष लोणकर महिला आघाडीच्या नेत्या पुष्पाताई शिंदे
निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष प्रदीप शिंदे

आधी पदाधिकारी उपस्थित होते

27 नोव्हेंबर परंडा येथे होणाऱ्या आरोग्य शरीरात प्रत्येक रुग्णाची सर्व प्रकारची तपासणी होणार आहे या ठिकाणी आलेल्या रुग्णांची जेवणाची नाश्त्याची सोय कारण्यात आली

तपासणी झाल्यानंतर रुग्णांना मोफत चष्मे वाटप अपंगांना अपंगांचे साहित्य कर्ण दोष असणाऱ्यांना मशीन देण्यात येणार आहे

या आरोग्य शिबिरात एखाद्या रुग्णावर महागडी शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल तर त्या रुग्णावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत मोफत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करून दिले जाणार आहे

महाराष्ट्र शासनाचा आरोग्य शिबिराचा फायदा प्रत्येक रुग्णाला व्हावा म्हणून रुग्णांना परंडा येथे येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

या महा आरोग्य शिबिरात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या रुग्णांनी करमाळा शिवसेना मध्यवर्ती कार्याची संपर्क साधावा करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group