गणेश चिवटे यांच्या विकासकामांचा धडाका सुरूच,कोंढेज,सौंदे नंतर झरे येथील विविध कामांचे भूमिपूजन
करमाळा प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या विकास कामांच्या उद्घाठनांचा सपाटा दररोज चालू आहे. अलीकडेच कोंढेज या गावानंतर त्यांनी आज दोन रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन झाले तसेच सौंदे येथे बाळनाथ मंदिर परिसरात भव्य अशा सभामंडपाचे लोकार्पण झाले. आज झरे येथे चौधरी वस्ती व बागल वस्ती येथे रस्त्यासाठी त्यांनी 15 लाख रुपये निधी मंजूर केला आहे, या दोन्ही कामांचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले.सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात सात ते आठ कोटी रुपयांच्या विकासकामासाठी गणेश चिवटे यांनी खेचून आणला आहे या सर्व मंजूर कामाचे उद्घाटन सध्या ते करत आहेत.मौजे झरे येथे आज त्यांच्या हस्ते करण्यात आले,या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा झरे ग्रामपंचायतचे सदस्य सोमनाथ घाडगे यांनी केले होते,
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पै अफसर तात्या जाधव ,तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे,वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार,दहिगावचे उपसरपंच लक्ष्मण शेंडगे,पोफळजचे उपसरपंच बिभीषण गव्हाणे, पोथरेचे सरपंच विष्णू रंदवे ,मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक धर्मराज नाळे,नितीन कानगुडे, हर्षद गाडे, भैयाराज गोसावी आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
