आमदार संजयमामांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र दिनाच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त आज सकाळी आठ वाजता करमाळा तहसील कार्यालय आवारात आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी स.पो.नि.सचिन जगताप यांचे नेतृत्वाखाली पोलीस दल व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या जवानांनी राष्टध्वजास मानवंदना दिली.या कार्यक्रमास तहसीलदार समीर माने,पं.स.गटविकासाधिकारी मनोज राऊत,सार्वजनिक बांधकाम उपअभियंता उबाळे,निवासी नायब तहसीलदार विजय जाधव,महसूल नायब तससीलदार सुभाष बदे,पं.स.शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बदे,स.पो.नि.साने,जगताप,माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत,मकाईचे माजी संचालक विवेक येवले,माजी पं.स.सदस्य राहुल सावंत,दत्ता जाधव,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अश्पाकभाई जमादार,मानवाधिकार समितीचे आयुबभाई शेख,मोझेस आसादे आदींसह शासकीय अधिकारी,पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.यावेळी कुंभेज येथील शहिदपत्नी राणी अप्पासाहेब काटे यांचा आमदार संजयमामांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.दादासाहेब पुजारी,श्रीकांत कांबळे यांच्यासह आयएसओ प्रमाणपत्र मिळालेल्या पाच शासकीय स्वस्त धान्य दुकान चालकांना यावेळी संजयमामांच्या हस्ते या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.तसेच या कामी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल महसूल नायब तहसीलदार सुभाष बदे यांचा आमदार संजयमामांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
