ताज्या घडामोडी

प्रा.महेश निकत यांना शैक्षणिक क्षेत्रातील पद्मश्री डॉ. मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर

करमाळा प्रतिनिधी

राष्ट्रभक्तीने : प्रेरित होउन समर्पित भावनेने विविध क्षेत्रांत कर्मयोगाने उल्लेखनिय कार्य करणाऱ्या नामांकित व्यक्तींना पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बारामती व करमाळा तालुक्यात कमी दिवसात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम केल्याबद्दल ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चे प्रा.महेश निकत यांना शैक्षणिक क्षेत्रातील पद्मश्री डॉ. मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान ही मॅगसेसे पुरस्कार प्राप्त संस्था असून नीती आयोग भारत सरकार संलग्नित आहे. या संस्थेच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह,गुंजन टॉकीजजवळ, येरवडा, पुणे येथे गुरूवार दि. २७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे समाजसेवक, प्रवचनकार प्रबोधनकार अपंगसेवक ह्यांनी दिली आहे.
ह्या कार्यक्रमासाठी खासदार उन्मेषदादा भैय्यासाहेब पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष तर आमदार सुरेश तथा राजुमामा भोळे, डॉ संजय कोलते आय ए एस प्रमुख कार्यकारी संचालक स्मार्ट सिटी पुणे, अनुव्रतश्री डॉ ललीता जोगड साहित्यिक मुंबई, संजय एम. देशमुख ( निंबेकर ) संस्थापक राष्ट्रीय – अध्यक्ष लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ ( राष्ट्रीय संघटना) अकोला, निनाभाऊ खर्चे अध्यक्ष पिपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ, सचिव नितिन बारसू बोंडे, डी. के. देशमुख भ्रातृमंडल बुलडाणा, डॉ अशोक के पाटील उपाध्यक्ष डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!