आदिनाथ निवडणुकीबाबत कारखाना सतर्क होता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पहिल्या टप्प्यातील पैसे जमा केले होते- धनंजय डोंगरे
करमाळा प्रतिनिधी – श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर जरी आज प्रशासक नेमले गेले असले तरी आम्ही कारखान्याचे जबाबदार संचालक मंडळ या नात्याने कायम सतर्क होतो. कारखान्याने कायम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या सुचनेनुसार काम केले आहे. त्यांनी केलेल्या पत्रव्यवहारे आम्ही कारखान्याच्या प्रारुप मतदार याद्या, संस्था ठराव, पहिल्या टप्प्यातील रक्कम सर्व वेळेत जमा करुन आज कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आला यामध्ये कारखाना संचालक मंडळाची कोणती ही चुक नसल्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सांगितले.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या सुचनेनुसार प्रत्येक वेळी आम्ही कारखान्याची वेळेत माहिती त्यांच्या कार्यालयास सादर केली होती. पहिल्या टप्प्यातील रक्कम भरुन निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करावी असे ही सांगितले होते. कारखान्याच्या वतीने उर्वरित रक्कम ही आम्ही लवकरच भरणार होतो, कोणताही प्रकार जबाबदार संचालक मंडळ या नात्याने आम्ही मुद्दाम केलेला नसून जरी प्रशासक नेमण्यात आला असला तरी सहकार्य करण्याची आमची भूमिका कायम असेल. आदिनाथ कारखान्याची निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करु असे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सांगितले.
चौकट
आज आदिनाथ कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आला अशी माहिती मला मिळाली, आमच्या वतीने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना प्रत्येक माहिती आम्ही वेळेत सादर केली होती. पहिल्या टप्प्यातील रक्कम ही वेळेत भरली होती. उर्वरित रक्कम भरण्याची तयारी ही कारखान्याने केली होती. यापुढे जरी प्रशासक नेमण्यात आला तरी आम्ही त्यांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवून निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडू- चेअरमन धनंजय डोंगरे
