केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची काॅग्रेंस तालुकाध्यक्ष गोरख उर्फ दादासाहेब लबडे यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा अन्यायकारक असा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करमाळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष गोरख उर्फ दादासाहेब लबडे यांनी निवेदनाद्वारे केद्रंसरकारकडे करण्यात आली असून या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्यावतीने तहसीलदार समीर माने दिले आहे. सदर निवेदनात असे म्हटले आहे की जगभरात लाॅकडाऊन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले असून कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती. पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यावर अन्याय केला आहे तीन महिन्यापूर्वी म्हणजे 4 जून 2020 रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा बटाटा ,डाळींना ,जीवनावश्यक वस्तूचे यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. आणि तीन महिन्यात घुमजाव करत निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होणार आहे . कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे वतीने शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी तहसील कार्यालयासमोर काॅग्रेसचे माननीय प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आंदोलन करण्यात आले असून कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोरख उर्फ दादासाहेब लबडे यांनी दिला आहे. या निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोरख उर्फ दादासाहेब लबडे, करमाळा नगरीचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब पवार, वंचित आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष सुभाष बाप्पू ओहोळ , रायगावचे सरपंच दादासाहेब जाधव माजी पंचायत समिती सदस्य विष्णु दादा पारखे, वंचित आघाडीचे युवानेते पप्पू ओहोळ, बाळासाहेब कांबळे, राजेंद्र नाईकनवरे, अॅडव्होकेट रोहित घोगरे यांच्या सह्या असुन या वेळी काॅंग्रेंसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
