Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

शास्त्रीय नृत्य कलेचा वारसा आपण जपला पाहिजे -सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य नरारे सर यांचे प्रतिपादन

करमाळा प्रतिनिधी
भरतनाट्यम् हा एक शास्त्रीय नृत्य प्रकार आहे याची गरज करमाळ्यात होती.ही उणीव मितवा श्रीवास्तव यांनी भरुन काढली असे गौरवोद्गार मा.नरारे सर यांनी नटराज मूर्ती पूजे निमित्ताने काढले.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.ही गौरवास्पद बाब आहे.
आज विद्यार्थयांचा ताणतणाव खूप वाढत आहे.तो कमी करण्यासाठी नृत्य, संगीत ,खेळ या गोष्टी आज खूप महत्त्वाच्या ठरत आहे.असे ही गुरुवर्य मा.नरारे सर म्हणाले. मितवा श्रीवास्तव यांनी ही आपले विचार व्यक्त केले.त्या म्हणाल्या की माझ्या गावातील मुलींसाठी मी भरतनाट्यम् चा क्लास इथे सुरू केला.भरतनाट्यम् हा अभिजात्य नृत्य प्रकार आहे.समअंगी नृत्य प्रकार आहे.ही कला पडद्यावरच्या अनेक अभीनेत्रींना अवगत आहे.याच्या व्यायामाने वेटलॉस पण खूप जलद गतीने होतो.गुरुवर्य मयुरी जोशी पुणे तसेचसाहित्यिका व सामाजिक कार्यकर्ते डॉ सत्यपाल श्रीवास्तव व अंजली श्रीवास्तव तसेच नगमा मोमीन, मयंक अग्रवाल,यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.ज्योती ताई पांढरे,पुष्पा लुंकड,रचना राठोड,संगीता राठोड, जयश्री वीर,रेशमा जाधव अलका यादव,बालिका यादव, सुरेखा घाडगे,प्रा.डॉ.लाजवंती ठाकूर,इ मान्यवर उपस्थित होते.जान्हवी लोकरे,अक्षता राठोड,दिव्या वायकर,गौरी मांगले,वैष्णवी साळुंखे, इ.विद्यार्थीनी उपस्थित होत्या.श्रीनृत्यशेली भरतनाट्यम् च्या शुभारंभसाठी मा.संजयमामा शिंदे, मा.घुमरेसर,मा.नगराध्यक्ष वैभव जगताप,मा.दशरथजी कांबळे.मा.नागेश कांबळे, मा.करेपाटील सर, मा.महावीर अग्रवाल,मा.ललीत अग्रवाल,डॉ परदेशी, नरेंद्र ठाकूर,मा.दीपक चव्हाण,डॉ कविता कांबळे, डॉ,वर्षा करंजकर,मा.सुनिता देवी,मा,आसादे मॅडम,मा.धनश्री दळवी,लीड स्कूलच्या शिल्पा मॅइम यांनी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या.आभार अंजली श्रीवास्तव यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group