करमाळा शहरात युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य तिरंगा ध्वज यात्रा
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात 15 ऑगस्ट,2022 रोजी स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सवानिमित्त भव्य तिरंगा ध्वज यात्रा श्री.शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.या तिरंगा ध्वज यात्रेस करमाळा तालुक्यातील व शहरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 325 फूट लांबीच्या या तिरंगा यात्रेची सुरुवात महात्मा गांधी विद्यालयातील राष्ट्रीय ध्वज फडकवल्यानंतर करण्यात आली. महात्मा गांधी विद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भारत देशात होऊन गेलेल्या महापुरुषांचे व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. त्यांनी तिरंगा ध्वज यात्रेची शोभा वाढवली.
तिरंगा ध्वज यात्रा करमाळा शहरातून जात असताना करमाळा शहरातील नागरिकांनी हा डोळे दिपवणारा क्षण कोणी कॅमेरा मध्ये क्लिक केला तर कोणी स्वतः तिरंगा सोबत विविध पोषक परिधान केलेल्या विद्यार्थ्यांसोबत फोटो काढून या यात्रेमध्ये सहभागी झाले. शंभूराजे जगताप यांनी स्वतः यात्रेमध्ये पुढे उभे राहून पांढरा कुर्ता ,पांढरे धोतर व डोक्यावर पांढरी टोपी परिधान केली होती. करमाळा शहरातील काही मंडळींनी शंभुराजेंना आपण हुबेहूब देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप साहेबांसारखे दिसत आहात अशी उपमा दिली. शंभूराजेंनी या यात्रेमध्ये चालत असताना लहान चिमुरड्यांना, हात गाडीवाले, सफाई कामगारांना, पोलीस,होमगार्ड,करमाळा शहरातील नागरिकांना गुलाब देऊन “75 स्वातंत्र्य महोत्सवाच्या “खूप सार्या शुभेच्छा दिल्या आहे
