करमाळा

दहिगाव उपसा सिंचन बंदनलिकेचे पाईपलाईनचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी 16 मे रोजी अर्जुन नगर फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन -भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी दहिगाव बंदनलिका ‌ पाईपलाईनचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी ‌ 16 मे रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन अर्जुन नगर फाटा चौक येथे करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी करमाळा पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक भाई जमादार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस अजिंक्य भैय्या पाटील उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना भरत भाऊ आवताडे म्हणाले की करमाळा अर्जुन नगर फाटा चौकात 16 मे रोजी दहिगाव बंद नलिका पाईपलाईनचे बंद पडलेले काम पाटबंधारे खात्यामार्फत त्वरित सुरू करण्यासाठी सकाळी नऊ वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन होणार आहे. करमाळा तालुक्यातील पूर्व भाग आता कुठे बागायत भाग होत असून त्यामुळे शेतकऱ्यांची जीवन सुखी होत असतानाच या बंद पाईपलाईनला विरोधासाठी विरोध करत पाईप जाळून टाकण्याचे काम केल्यामुळे सदर पाईपलाईनचे काम ‌ अद्याप अपूर्ण असून एकूण 287 किलोमीटर असणाऱ्या या पाईपलाईनच्या फक्त 87 किलोमीटर पाईपलाईनचे काम आतापर्यंत झाले आहे. दहिगाव उपसासिंचनचे पाणी पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना मिळण्यासाठी बंद नलिकेद्वारे पाणी देण्याचा निर्णय शासनामार्फत 2007 साली झाला असून विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या कालावधीत संबंधित निर्णय झाला होता. त्यावेळी आमदार सत्तेमध्ये असतानाही आमदार नारायण आबा पाटील यांनी बंद नलिकेतून पाणी देण्यास विरोध केला नाही मग आत्ताच विरोध करून शेतकऱ्याच्या तोंडाला आलेला घास का हिरावत आहे असा सवाल भरत भाऊ अवताडे यांनी केला आहे. एक तर आपण दहिगाव बंधनलिकेचे काम पूर्ण करून आम्हा सर्वांना न्याय द्यावा अन्यथा सदर बंद नलिकेद्वारे पाणी देण्याचा निर्णय शासनामार्फत रद्द करून आमच्या शेतापर्यंत चाऱ्या खोदून आमच्या पिकांना पाणी देण्याची कायमस्वरूपी सोय करावी आम्हाला फक्त आमची गरज महत्त्वाची आहे .आमची उभी पिके शेतात उभी असून पाण्याअभावी ती जळून चालली आहेत त्यामुळे आपण विद्यमान लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळून देण्यासाठी दहिगाव उपसा सिंचन‌ बंधनलिकेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे ही आमची हात जोडून विनंती आहे. आमचे नेते करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आम्ही 16 मेचे आंदोलन झाल्यानंतर शिष्टमंडळासह ‌ भेट घेऊन संबंधित परिस्थिती त्यांच्या कानावर घालणार आहोत संबंधित निर्णय लवकरात लवकर झाला नाही तर करमाळा तालुक्यातील शेतकरी बांधवाबरोबर विधानभवनावर भव्य असा मोर्चा काढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत असून आम्हाला करमाळा तालुक्यातून भरघोस पाठिंबा मिळत असून भाजप शिवसेना मनसे ‌ शेतकरी संघटना प्रहार संघटना यांनीही आपल्याला पाठिंबा दिला असून आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.*

error: Don\'t try to copy. Content is protected !!