Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

मामा है तो मुमकीन है ! कोर्टी – कुस्करवाडी ग्रामस्थांची भावना…


करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांनी गतवर्षी जानेवारी 2023 महिन्यात संपूर्ण करमाळा विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. दि. 24 जानेवारी 2023 रोजी खास लोकआग्रहास्तव कुस्करवाडी येथे सायंकाळी भेट दिली होती. कुस्करवाडीकडे मार्गक्रमण करताना, अतिशय खराब आणि खाच खळग्यांचे रस्त्ते दिसून आले. यावरुन, यांची काय समस्या असू शकते याचा अंदाज मामांना आला होता. बैठकीच्या वेळी सर्वांनी एकच कैफियत मांडली,आम्ही गेली कित्येक वर्षे पक्क्या रस्त्याची मागणी अनेक लोक प्रतिनिधींना करत आलो आहोत. परंतू तात्पुरती आश्वासने देऊन आमची बोळवण केली जात आहे. अनेक वेळा निवेदने, निवडणूकीवर बहिष्कार देखील टाकलेला आहे. कुस्करवाडीची लोकसंख्या कमी असल्याने पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी होत नव्हती ही कैफियत संजयमामांनी ऐकून खास बाब म्हणून बांधकाम विभागास शिफारस केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेपुटी इंजिनिअर उबाळे साहेब यांनीही तातडीने सर्वे करून तांत्रिक मंजुरी बाबत कार्यवाही केली. अखेर शासन निर्णय क्रमांक पीएलएन २०२३/सीआर ७२४७/नि_३ अन्वये २ कोट रु. निधी मंजूरीचा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीतून या रस्त्यावर मुरूमीकरण,खडीकरण, मजबूतीकरण, कच्च्ये गटर्स, मुरुम बाजूपट्टी, डांबरीकरण होणार आहे.लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर कार्यारंभ आदेश निघून कामास सुरुवात होईल. ही बातमी कळताच, कुस्करवाडी व या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांनी आनंद व्यक्त करून एकच बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली, “मामा है तो मुमकीन है!”|

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group